गौण खनिजाच्या वाहतुकीने रिधोरा-राजुरा रस्त्याची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:29+5:302021-01-13T05:44:29+5:30
राजुरा परिसरात सध्या स्थितीत नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह श्रीक्षेत्र शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. यापैकी अकोला-हैदराबाद ...
राजुरा परिसरात सध्या स्थितीत नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह श्रीक्षेत्र शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. यापैकी अकोला-हैदराबाद व शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गाचे कामासाठी लागणाऱ्या मुरुमासह इतरही गौण खनिज आणि साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात रिधोरा-राजुरा या रस्त्यावरून दिवस रात्र सुरू आहे. परिणामी या रस्त्याची दैना होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गत दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. त्यामुळे हा रस्ता सुस्थितीत होता; परंतु अलीकडेच महामार्गासह पालखी मार्गाच्या कामासाठी या रस्त्याने जड वाहने मोठ्या प्रमाणावर धावत असल्याने. हा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडून खराब झाला आहे. शिवाय या वाहनांच्या धुळीमुळे रस्त्यालगत असलेल्या शेतातील गहू, हरभरा पिकांसह इतर रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणात धूळ बसून पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
-----------
कोट : महामार्ग व पालखी रस्ता निर्मितीच्या जड वाहनाने रस्त्याची वाट लागत आहे. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. संबंधित यंत्रणेने या प्रकारावर नियंत्रण मिळवून दिलासा द्यावा.
ओंकार आंधळे,
शेतकरी, राजुरा
-----------------
कोट : गौण खनिजाच्या जड वाहतुकीने रिधोरा-राजुरा रस्त्याच्या होत असलेल्या नुकसानाची पाहणी करून वरिष्ठांकडे तत्काळ अहवाल सादर करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार रस्त्याची स्थिती चांगली राखण्याचे उपाय केले जातील.
डी. सी. खारोळे
उपविभागीय अभियंता, सा. बां. विभाग, मालेगाव
===Photopath===
100121\10wsm_1_10012021_35.jpg
===Caption===
गौणखनिजाच्या वाहतुकीने रिधोरा-राजुरा रस्त्याची दैना