टंचाईग्रस्त भागात टँकर मंजूरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:06 PM2018-11-30T14:06:56+5:302018-11-30T14:10:25+5:30
वाशिम : दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे सुपूर्द केले आहेत.
वाशिम : दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे सुपूर्द केले आहेत. अन्य जिल्हे व तालुक्यांमध्येही टँकसर््चे मंजूरीचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना प्रदान करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आला आहे. यापूर्वी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांकडे होते.
कमी पर्जन्यमानामुळे राज्यातील १५१ तालुक्यांसह २६८ महसूल मंडळांमध्ये दूष्काळ घोषित करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका तसेच मालेगाव व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा दोन महसूल मंडळांचा समावेश आहे. दूष्काळी परिस्थिती निवारणार्थ या भागात विविध उपाययोजनाही लागू करण्यात आलेल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याला विलंब होऊ नये म्हणून टँकसर्् मंजूर करण्याबाबतचे अधिकार महसूल विभागाने संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाºयांना २९ नोव्हेंबरच्या आदेशान्वये बहाल केले आहेत. यापूर्वी टँकसर्् मंजूरीचे अधिकार हे जिल्हाधिकाºयांकडे होते. दुष्काळ घोषित केलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याचे टँकसर्् मंजूर करण्याचे अधिकार आवश्यकतेनुसार उपविभागीय अधिकाºयांना प्रदान करण्याची जबाबदारीही विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीत टँकसर्् मंजूरीसंदर्भात शासनाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम