रिसोड शहरातील एटीएम सेवा विस्कळीत; ग्राहकांचे हाल
By admin | Published: April 27, 2017 12:25 AM2017-04-27T00:25:16+5:302017-04-27T00:25:16+5:30
रिसोड : शहरातील एटीएम सेवा विस्कळीत असल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे
रिसोड : शहरातील एटीएम सेवा विस्कळीत असल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे
नोटाबंदीनंतर मार्चपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होवून विड्रॉलची मर्यादा हटविली जाईल, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत होते. मात्रण एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रोकड टंचाईची तिव्रता अधिकच निर्माण झाली. बँकेत पुरेस पैसे नसल्याने ३० ते ४० हजार रुपयापेक्षा अधिक रकमेचे विड्राल मिळेनासे झाले आहेत. बहुतांश एटीएम मध्ये सुध्दा ठणठणाट असल्याने गेल्या काही दिवसापासून ते बंदच आहेत. कधी तरी एखादेवेळी थोडी फार रक्कम एटीएममध्ये टाकल्या जाते. मात्र ती अपुरी असल्याने त्वरित बंद करावी लागत आहे. स्टेट बँक, आलाहाबाद बँक, बँक आॅफ इडिंया, बँक आॅफ महाराष्ट्र, जिल्हा बँकेचे एटीएम कधी सुरू तर कधी बंद असतात. सध्या लग्नसराई असल्याने प्रत्येकाला रक्कम हवी आहे, मात्र एटीएम बंदमुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी ग्राहकांना त्रास होत आहे. शेतकऱ्यांना एकीकडे पिककर्ज मंजूर तर केले. मात्र विड्राल होत नसल्याने त्यांना खरीप हंगामासाठी बि-बियाणे खरेदीसाठी अडचण जात आहे. लग्न सराईत कॅशलेस व्यवहार करणे अवघड असल्याने चिल्लर व्यवहार करण्यासाठी एटीएमचे माध्यम आहेत. मात्र ते बंदच राहत असल्याने तसेच बाहेर गावावरुन आलेल्या ग्राहकांसाठी सुध्दा अडचणीचे ठरत आहे.