रब्बी ज्वारीच्या कडब्याच्या भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:48+5:302021-04-16T04:41:48+5:30
वाशिम : पशुधनाच्या चाºयासाठी रब्बी ज्वारीच्या कडब्याच्या भावात वाढ झाली असून, पशुधन जगविण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने कडबा खरेदी ...
वाशिम : पशुधनाच्या चाºयासाठी रब्बी ज्वारीच्या कडब्याच्या भावात वाढ झाली असून, पशुधन जगविण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने कडबा खरेदी करून साठवण करीत आहेत. ज्वारीच्या शंभर पेंढ्यांना दीड हजारापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे.
दरवर्षी पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यात गतवर्षी रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढले असले तरी ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. ज्वारीच्या तुलनेत हरभºयाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे ज्वारीचा कडबा खरेदी करण्यासाठी शेतकरी आतापासूनच धडपड करीत असून, मिळेल त्या भावाने कडब्याची खरेदी करीत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर वाढत चालला असला तरी इंधनाचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने शेती करणारे शेतकरीसद्धा पुन्हा बैलांच्या उपयोगाकडे वळत असल्याचे दिसून येते. दुग्धव्यवसाय करणाºया पशुपालकांना या महागाईची झळ बसत आहे. पशुधन जगविण्यासाठी कडब्याची आवश्यकता असल्याने शेतकरी आतापासूनच कडब्याची मिळेल त्या भावाने खरेदी करीत आहेत.
------------- बॉक्स ----------------
शेकडा दीड हजारापेक्षा अधिक भाव
ज्वारीचा कडबा खरेदी करण्यासाठी शेतकरी आतापासूनच धडपड करीत आहेत. टेम्पो, ट्रॅक्टर, बैलगाडी आदींच्या साह्याने कडब्याची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेकडा दीड हजारापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे. शिवाय, वाहतुकीचा वेगळा खर्च करावा लागत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.
------------- बॉक्स ----------------
इंधन वाढीचा मशागतीवर परिणाम
शेतीच्या मशागतीसाठी मध्यंतरीच्या काळात लहान-मोठ्या ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. त्यामुळे पेरणीपासून नांगरणीपर्यंतची सर्व कामे ट्रॅक्टरच्या मदतीने केली जात होती. मात्र, सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले असल्याने याचाही फटका शेतकºयांना बसत आहे.