ऋषिकेश कांत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:10+5:302021-07-23T04:25:10+5:30
तसेच इयत्ता १० वी मधून संचिता संतोष राजूरकर, अदिती गणेश मालटे यांनी विशेष पारितोषिक प्राप्त केले. मानसी संजय बंग ...
तसेच इयत्ता १० वी मधून संचिता संतोष राजूरकर, अदिती गणेश मालटे यांनी विशेष पारितोषिक प्राप्त केले. मानसी संजय बंग हिने प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले; तर वर्ग ९ मधून कृतिका शेखर अग्रवाल, कीर्ती मुकेशराव चौधरी, आयुष अजय शंकरपुरे यांनी विशेष पारितोषिक प्राप्त केले. तसेच पार्थ देवानंद बाकल, सिद्धी सुनील भिंगारे, रसिका रविशंकर माहुलकर यांनी तालुकास्तरीय पारितोषिक प्राप्त केले. तसेच मंथन रवींद्र राऊत आणि कु. दिव्यानी संतोष पवार यांनी प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले.
वर्ग ८ मधून आदेय शिशिर डोणगावकर, नुपूर संजय राठोड यांनी तालुकास्तरीय पारितोषिक प्राप्त केले. भूमी विनोद उजवणे हिने प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कारंजा एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळासह जे. सी. हायस्कूलचे प्राचार्य, पर्यवेक्षक, आर. जे. चवरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, आर. जे. चवरे कॉन्व्हेन्टच्या प्रभारी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काैतुक केले.