रिसोड नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस 

By admin | Published: April 3, 2017 01:45 PM2017-04-03T13:45:50+5:302017-04-03T13:45:50+5:30

शहर हागणदरीमूक्त केल्याबद्दल रिसोड नगर पालिकेला शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

Rishod Nagar Parishad gets one crore prize | रिसोड नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस 

रिसोड नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस 

Next

शहर हागणदरीमूक्त: ३० लाखांचा पहिला हप्ता प्राप्त
वाशिम: महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून शहर हागणदरीमूक्त केल्याबद्दल रिसोड नगर पालिकेला शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.  त्यामधील ३० लाखांचा पहिला हप्ता नगर परिषदेला प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सोमवारी दिली. 
रिसोड शहरात सन २०१५ पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन इत्यादि बाबींचा समावेश करण्यात आला. त्यानुसार शहरातील ज्या कुटुंबांकडे शौचालय अशा कुटुंबांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले. त्यानंतर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर गुडमॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाद्वारे कारवाई केली. रिसोड शहर स्वच्छ व हगणदरीमूक्त करण्यासाठी समितीने शासनास सादर केला. त्यानुसार १६ मार्च २०१७ व १७ मार्च २०१७ ला राज्यस्तरीय समितीमार्फत पडताळणी करण्यात आली. यामध्ये नगर परिषद शाळा, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय नवीन सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन तसेच शहरातील उघड्यावर शौचास जाण्याच्या जागांची पाहणी या पथकाने केली आणि नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये शहर हागणदरीमूक्त झाल्याचा रिसोड नगर परिषदेचा दावा खरा असल्याचे त्या पथकाला आढळले. त्यानुसार शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. त्या अहवालावरून नगर विकास विभागाने रिसोड शहर हागणदरीमूक्त झाल्याचे जाहीर केले आणि शहराला त्याबद्दल एक कोटी रुपयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

Web Title: Rishod Nagar Parishad gets one crore prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.