रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक येथे क्रिकेट स्पर्धेला थाटात प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:47 PM2018-02-28T15:47:45+5:302018-02-28T15:47:45+5:30

रिसोड (वाशिम) - तालुक्यातील मांगुळ झनक येथ शिवशंभु क्रिकेट स्पर्धेला २७ फेब्रुवारीपासून थाटात प्रारंभ झाला असून, जवळपास ४५ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

Rishod taluka mangul jhanak cricket tournament start | रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक येथे क्रिकेट स्पर्धेला थाटात प्रारंभ!

रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक येथे क्रिकेट स्पर्धेला थाटात प्रारंभ!

Next
ठळक मुद्देस्पर्धेचे उदघाटन काँग्रेसचे युवा नेते अँड. नकुल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास ४५ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.क्रिकेट चषक स्पर्धेत प्रथम बक्षीस ३१००१ रुपये, द्वितीय २१००१ तर तृतीय बक्षीस ११००१ आहे.

रिसोड (वाशिम) - तालुक्यातील मांगुळ झनक येथ शिवशंभु क्रिकेट स्पर्धेला २७ फेब्रुवारीपासून थाटात प्रारंभ झाला असून, जवळपास ४५ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसचे युवा नेते अँड. नकुल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती क्रीडा संकुल मांगुळ झनक येथे सुरू असलेल्या शिवशंभु क्रिकेट चषक स्पर्धेत प्रथम बक्षीस ३१००१ रुपये, द्वितीय २१००१ तर तृतीय बक्षीस ११००१ आहे. सोबतच प्रोत्साहनपर पारितोषिक सुध्दा देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाला गोवर्धन सर्कलचे माजी जि.प सदस्य प्रभाकरराव तहकीक, पवन पाटील मोरे, अमोल पाटील भुतेकर, विलासराव दांदडे, डॉ.मंडलिक, केशवराव बाजड, सुरेश पाटिल जाधव यांची उपस्थिती होती.स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने अँड. नकुल देशमुख व उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देशमुख यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास निलेश पाटील घायाळ, भूषण पाटील दांदडे, विठ्ठल पाटिल घोटे, गणेश काळे, सतिष काळे, शेख शाहरुख, रामा काळे, शेख सलमान, अनिल पाटील कोरडे, शरद पाटिल कोरडे, सीताराम गायकवाड, सोहम पाटील दांदडे, शेषराव मोरे, पुरुषोत्तम साबळे, नागेश काळे, विष्णू पाटील नवघरे, बाळु पाटील नवघरे, वैभव पाटील भुतेकर, ज्ञानेश्वर देशमुख देगाव, विनोद देशमुख, ज्ञानेश देशमुख यांच्यासह क्रिकेटप्रेमी अँड.नकुलदादा देशमुख मित्रमंडळ रिसोड मालेगाव विधानसभा व शाखा मांगुळ झनकचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. संचालन दीपक भुतडा यांनी केले.

Web Title: Rishod taluka mangul jhanak cricket tournament start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.