ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात

By admin | Published: December 19, 2014 01:17 AM2014-12-19T01:17:54+5:302014-12-19T01:17:54+5:30

ढगाळ वातावरणाने पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव.

The risk of crops due to cloudy weather | ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात

Next

वाशिम : ढगाळ वातावरण व धुके यामुळे वातावरणात आद्र्रता तयार होते. यामुळे पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तसेच धुक्यामुळे वातावरणातील विषारी रसायन पिकांवर पडून पिकांची शेंडे करपणे, फुले, कोवळी फळे व शेंगा गळून पडू शकतात. यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. यासंदर्भात कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतिने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गत काही दिवसांपासून थंडी मोठय़ा प्रमाणात पडत आहे. या थंडीचा तूर पिकाला चांगला फायदा होऊ शकतो, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे; परंतु ढगाळ वातावरण व धुक्यामुळे तुरीसह इतरही पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवते. दोन दिवसांपूर्वी वातावरणात बदल होऊन धुके पडल्याने रब्बीतील हरभरा, तूर, पालेभाज्या उत्पादक शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
तूर पिकांवर शेंगा धरल्यावर व्यवस्था असल्यास पाणी देणे आवश्यक आहे. यासह बड वेव्हिल,, शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी,, शेंगेवरील ढेकूण, पिसारी पतंगाची अळी व शेंगमाशीची अळी या किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन किडीच्या नियंत्रणाकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हरभरा पिकाबाबतही याच पध्दतीेने काळजी घेणे गरजेचे आहे. गत चार ते पाच दिवसांपासून थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने आजाराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गळ्याचा त्रास मोठया प्रमाणात दिसून येत आहे.

Web Title: The risk of crops due to cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.