महाराष्ट्र अर्बनच्या रिसोड शाखेचा प्रारंभ थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:15+5:302021-07-02T04:28:15+5:30
बुलडाण्याचे शिवसेना खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित ...
बुलडाण्याचे शिवसेना खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित मेहकच्या रिसोड शाखेचा प्रारंभ मंगळवार, २९ जून रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून संबोधित करत होते.
यावेळी मंचावर संस्थापक अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सदस्य ॲड. किरणराव सरनाईक, माजी आमदार ॲड. विजयराव जाधव, बाबाराव पाटील खडसे, संत अमरदास अर्बनचे अध्यक्ष उत्तमचंद बगडीया, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, माजी सभापती बाळासाहेब खरात, महाराष्ट्र अर्बनचे अध्यक्ष ऋषी जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र पळसकर, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, नगराध्यक्ष विजयमाला असनकर, सहायक निबंधक एकनाथ काळबांडे, दुय्यम निबंधक शिवाजी पांगरे, तहसीलदार अजित शेलार, माजी सभापती श्यामराव उगले, बबन पाटील गारडे, आदी मान्यवर हजर होते.
यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्र अर्बनच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात महाराष्ट्र अर्बनने मातोश्री सिंधुताई जाधव कोविड सेंटर उभे करून विनामूल्य आरोग्य सेवा देत असताना त्यांची औषधी, जेवण, आदी सर्व सेवा पुरविण्याचे काम केले. महाराष्ट्र अर्बन केवळ सहकारापूर्ती मर्यादित न राहता सामाजिक दायित्वापासून दूर न जाता सामाजिक भान ठेवून आवश्यक ती सगळी विधायक कामे करण्याचा प्रयत्न करेल व आपल्या विश्वासाला पात्र ठरेल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. गजानन उल्हामाले यांनी केले, तर सूत्रसंचालन पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक तथा स्थानिक सल्लागार देविदास नागरे, डॉ. दिलीपराव धोपे, राजकुमार छित्तरका, किशोर कोठुळे, पंजाबराव बोडखे, सुरेशराव जुनघरे, दीपक संत्रे, मारोतराव रंजवे, दत्तराव पौळ, महादेव घुगे, विजय उकळकर, यशवंत देशमुख, व्यवस्थापक रामेश्वर मेंटांंगळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव व अध्यक्ष ऋषी जाधव, कार्यकारी संचालक अजय उमाळकर यांचा पुष्पहार व श्रींची आकर्षक मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. (वा. प्र.)