रिसोड आगाराच्या रिसोड-मालेगाव बसफेऱ्या केल्या बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:36 PM2020-06-07T16:36:14+5:302020-06-07T16:36:22+5:30

रिसोड आगाराने रिसोड ते मालेगाव मार्गावरील बससेवा ६ जूनपासून बंद केली आहे. 

Risod-Malegaon bus services of Risod depot closed | रिसोड आगाराच्या रिसोड-मालेगाव बसफेऱ्या केल्या बंद 

रिसोड आगाराच्या रिसोड-मालेगाव बसफेऱ्या केल्या बंद 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे कारण समोर करीत रिसोड आगाराने रिसोड ते मालेगाव मार्गावरील बससेवा ६ जूनपासून बंद केली आहे. 
कोरोनामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागून आहे. लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली. मागील महिन्यात काही अटी, शर्तीवर जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासी बसेस वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली. त्यानुसार रिसोड आगारातून रिसोड ते मालेगाव मार्गावर चार बस फेऱ्या सुरू केल्या होत्या. सहाजिकच कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता अपेक्षित प्रवासी बस मध्ये प्रवास करत नव्हते. त्यातच बसफेºया कमी असल्याने व वेळापत्रक नसल्याने प्रवासी हे बसमध्ये प्रवास करण्यास धजावत नव्हते. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता अधिक देण्यात आल्याने १ जूनपासून लोकांची हळूहळू गर्दी वाढत असताना रिसोड आगाराने ६ जूनपासून रिसोड ते मालेगाव मार्गावरील बसफेºया प्रवाशी मिळत नसल्याचे कारण पुढे करून पूर्णत: बंद केल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन नाही अशा प्रवाशांची परवड होत आहे. सध्या खासगी प्रवाशी वाहतुकीस परवानगी नाही. त्यामुळे बºयाच नागरिकांना महामंडळाच्या बसेसचा आधार राहतो. महामंडळाने बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
 
सोमवारपासून बसफेऱ्या वाढविल्या जातील
प्रवाशांच्या सेवेसाठीच बसेस असून, प्रवाशीहिताला प्राधान्य देण्यात येते. रिसोड ते मालेगाव मार्गावर सुरू असलेल्या बस फेºयांना अपेक्षित प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे या मार्गावरील बसफेºया कमी करण्यात आल्या. सोमवारपासून बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे रिसोडचे आगार प्रमुख एस.एस. जगताप यांनी सांगितले.
 
काही काळ लोकांनी एस टी बस मधून प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे एसटी बसला प्रवासी मिळत नव्हते हे सत्य आहे. मात्र आता हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. तसेच कामानिमित्त बाहेरगावी सुद्धा जात आहेत. रिसोड आगाराचा बस फेºया बंद करणे हा निर्णय चुकीचा आहे. 
-विश्वासराव सरनाईक,
ग्रामस्थ, दापुरी

Web Title: Risod-Malegaon bus services of Risod depot closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.