जनता कर्फ्यू : चवथ्या दिवशीही रिसोड बाजारपेठ बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:37 PM2020-09-08T16:37:27+5:302020-09-08T16:37:46+5:30
चवथ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड शहरात ५ सप्टेंबरपासून ‘जनता कफ्यू’ची हाक देण्यात आली. चवथ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रिसोडकरांची चिंताही वाढत आहे. बाहेरगावावरून परतलेल्या नागरिकांमुळे रिसोड शहरात १्२ जून रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. कोेरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जून महिन्यात व्यापारी व शहरवासियांनी चार दिवस जनता कर्फ्यू तसेच जुलै महिन्यात जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार सात दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात ‘अनलॉक-४’चा टप्पा सुरू होताच, शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी महासंघ व नगर परिषदेने ५ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यूची हाक दिली. चवथ्या दिवशीही ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
दरम्यान, ९ सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्ववत होणार असून, दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघ व नगर परिषदेने घेतला. त्यानुसार बुधवारपासून दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन व्यापारी व नगर परिषदेने केले.