रिसोड नगर परिषद निवडणुक : भाजपाची मेहनत व्यर्थ; अंतर्गंत गटबाजी भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:28 PM2018-12-10T16:28:49+5:302018-12-10T16:29:05+5:30

वाशिम  :  रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे.

Risod Municipal Council elections: BJP's hard work not fulfruit | रिसोड नगर परिषद निवडणुक : भाजपाची मेहनत व्यर्थ; अंतर्गंत गटबाजी भोवली

रिसोड नगर परिषद निवडणुक : भाजपाची मेहनत व्यर्थ; अंतर्गंत गटबाजी भोवली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  :  रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे.
रिसोड नगरपरिषद क्षेत्रामध्ये भगवानराव क्षिरसागर यांचे वर्चस्व असल्याने व त्यांचाच गटाचा नगराध्यक्ष असल्याने भाजपाने गत एक वर्षापूर्वी रणनिती आखून त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. ही सर्व खेळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आखल्या गेली असली तरी ज्यांनी क्षिरसागर यांना पक्षात समाविष्ट केले त्यांचेच तिकीट वाटपावेळी विचार न केल्याने भाजपाच्या ज्या नेत्यांनी रिसोड नगरपरषिद आपल्या ताब्यात यावी हे स्वप्न पाहले होते ते व्यर्थ गेले.  एका वर्षापूर्वी राकाँचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर हे तत्कालिन नगराध्यक्ष व काही नगरसेवकांसह भाजपात दाखल झाले ते येत्या निवडाण्ुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेवरचं. परंतु वेळेपर्यंत क्षीरसागर यांना पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेवटी क्षीरसागर कुटुंबातील मंगला किरण क्षीरसागर या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यात. यामध्ये क्षिरसागर यांचे तर नुकसान झालेच शिवाय ज्या नेत्यांनी त्यांना भाजपामध्ये आणले ते सुध्दा त्यांचे विरोधक झाले असल्याची चर्चा या निमित्ताने जोर धरत आहे. परंतु ज्यांनी क्षिरसागर यांना पक्षात आणले त्यांनी क्षिरसागर यांना भाजपाची उमेदवारी देण्यात यावी याासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. या व्यक्तिस भाजपाच्यावतिने उमेदवारी दिल्यास नगरपरिषद आपल्या ताब्यात राहू शकते पटवून सांगितले. परंतु पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे  ते हतबल झाले. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून आला. ज्यांनी नगरपरिषदेवर आपल्या पक्षाचे वर्चस्व रहावे यासाठी प्रयत्न केले त्यांनी संपूर्ण निवडणुकी दरम्यान ‘नरोबा-कुंजोबा’ ची भूमिका घेतल्याचे दिसून आले.

ये तो होना ही था....!
रिसोड नगरपरिषद निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा निकालावरुन स्पष्ट झाले. असे असले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी २०१८ च्या निवडणुकीत रिसोड नगरपरिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष विराजमन करण्यासाठी एक वर्षापूर्वी करण्यात आलेल्या प्रयत्नावर काही वरिष्ठ नेत्यांनी पाणी फिरविले. त्यामुळे सहाजिकच ज्यांनी नगरपरिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न केले ते निवडणुकीतील घडामोडीपासून दूर राहिले. आता निवडणूक निकालानंतर भाजपाला न मिळालेल्या यशावर मात्र तेच नेते ‘ये तो होना ही था...’ असे म्हणत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Risod Municipal Council elections: BJP's hard work not fulfruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.