रिसोड नगर परिषद निवडणुक; नामांकन अर्जाचा तिसरा दिवसही ‘निरंक’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:35 PM2018-11-14T16:35:33+5:302018-11-14T16:35:40+5:30
रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही.
नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज भरण्याला १२ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली असून, दुसºया तिसºया दिवसापर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही. १९ नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्जाची विक्री व स्विकृती राहणार आहे. रिसोड येथे थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. प्रत्येक पक्ष हा विरोधी पक्ष, आघाडीच्या संभाव्य उमेदवारांवर लक्ष ठेवून असल्याने अद्याप कोणत्याही पक्षाने आपले पत्ते खुले केले नसल्याचे दिसून येते. नामांकन अर्जाची स्विकृती व सादर करण्याला शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत.