रिसोड नगर परिषद निवडणुक : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला आसनकर विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:04 PM2018-12-10T15:04:30+5:302018-12-10T15:04:52+5:30
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. दुसºया स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
रिसोड नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक घेण्यात आली. यंदा प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवडणूक झाली. यावेळी पहिल्यांदाच प्रमुख पक्षांनी ही निवडणूक पक्षाच्या चिन्ह्यावर लढविली. यापूर्वी स्वतंत्र आघाडी, महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती. सोमवार १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. नगराध्यक्ष आणि एकूण १० प्रभागातून २० नगर सेवक पदासाठी ही निवडणूक झाली. अटितटीच्या या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनविकास आघाडीच्या विजयमाला कृष्णा आसनकर यांना सात हजार ६४२ मते, भारिप-बमसंच्या शेख नजमाबी ख्वाजा यांना चार हजार ९८८, शिवसेना, भाजपा, शिवसंग्राम महाआघाडीच्या ज्योती अरूण मगर यांना दोन हाजार ६२१, अपक्ष मंगला किरण क्षीरसागर यांना एक हजार १९० तर काँग्रेसच्या शितल बंडू वानखेडे यांना ९५६ मते मिळाली. आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. मतमोजणीनंतर आक्षेप घेण्यात आल्याने फेरमतमोजणी घेण्यात आली. यामध्ये आसनकर यांची २६५४ मतांची आघाडी कायम राहिली.
दरम्यान, नगर सेवक पदांच्या निवडणुकीत वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी झाले. काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे.
भाजपाचे खातेही उघडले नाही
नगर परिषद निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिवसंग्राम अशी महाआघाडी होती. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे उमेदवार उभे होते तर नगरसेवक पदासाठी भाजपाचे १४ उमेदवार उभे होते. भाजपाच्यावतीने खासदार संजय धोत्रे, अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा, माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोडात प्रचारसभाही घेतल्या. विजयराव जाधव तर रिसोड येथे तळ ठोकून होते. सोमवारी जाहिर झालेल्या निकालात नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकाही ठिकाणी भाजपाचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. खातेही उघडले नसल्याने हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी खासदार भावना गवळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. सोबत भारतीय जनता पार्टी, शिवसंग्राम पक्षाची रसद असतानाही, या महाआघाडीच्या उमेदवाराला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर महाआघाडीचा उमेदवार लढतीतही नसल्याचे दिसून येते.
बॉक्स..
काँग्रेस उमेदवाराची ह्यअनामतह्ण जप्त
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पाचव्या क्रमांकावर आहे. केवळ ९५६ मते असून, अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. नगर परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी मंत्र्यांनी रिसोड येथे हजेरी लावून प्रचार रॅलीही काढली होती. या रॅलीला मिळालेला प्रतिसाद हा मतदानात परावर्तीत झाला नसल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.