कामगार नोंदणीसाठी रिसोड पंचायत समितीवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:32 PM2018-07-31T14:32:24+5:302018-07-31T14:35:46+5:30
रिसोड : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत रिसोड येथील पंचायत समिती येथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गतरिसोडयेथील पंचायत समिती येथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. नोंदणी करण्यासाठी कामगारांची एक गर्दी झाल्याचे दिसून येते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या ज्या मजुरांनी गत १२ महिन्यात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केलेले आहे, अशा मजुरांना नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर विविध कल्याणकारी योजनांचे लाभ भविष्यात मिळणार असल्याचे सांगण्यात आले. बांधकाम कामगारांनी त्यांच्या नावाची नोंदणी करण्यासाठी यापूवी रिसोड पंचायत समितीच्या सभागृहात विशेष नोंदणी अभियान राबविले होते. नोंदणीपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून रिसोड पंचायत समिती येथे नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. ज्या कामगारांनी सन २०१७-१८ या वर्षात ९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केले आहे, अशा कामगारांची विशेष नोंदणी सुरू असून, पंचायत समितीवर एकच गर्दी होत आहे. सोमवार, मंगळवारी नोंदणीसाठी दूरवर रांग लागली होती. रिसोड तालुक्यातील सर्व सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामगारांना या नोंदणी अभियानाची माहिती देवून नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.