कोरोना लसीकरणात राज्यात रिसोड अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:18+5:302021-07-02T04:28:18+5:30

रिसोड शहरात १८ वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या जवळपास २८ हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी तब्बल २४००० व्यक्तींचे लसीकरण झाले असून, ...

Risod pioneers in the state in corona vaccination | कोरोना लसीकरणात राज्यात रिसोड अग्रेसर

कोरोना लसीकरणात राज्यात रिसोड अग्रेसर

Next

रिसोड शहरात १८ वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या जवळपास २८ हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी तब्बल २४००० व्यक्तींचे लसीकरण झाले असून, लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के ठरले आहे. यात समता फाउंडेशनचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. रिसोड शहरात पाच ठिकाणी लसीकरण शिबिरे घेण्यात आली. त्यात २२ दिवसांमध्ये तब्बत १७००० व्यक्तींचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले, तसेच ज्या व्यक्तींचे लसीकरण बाकी आहे अशा व्यक्तीसाठीही संख्येनुसार लसीकरण होणार आहे. यामुळे रिसोड या शहराचे नाव लसीकरणाबाबतीत देशपातळीवर पोहोचले असून, सर्वाधिक लसीकरण झालेले शहर म्हणून रिसोडचे नाव घेतले जात आहे. याबाबत मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा या कार्याचे तोंडभरून कौतुक केले व रिसोड येथे सर्वाधिक लसीकरण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे तसेच समता फाउंडेशनकडून गोवर्धन येथेही १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागांतही लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न समता फाउंडेशन करीत आहे.

Web Title: Risod pioneers in the state in corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.