लसीकरण मोहिमेत रिसोड तालुका आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:15+5:302021-07-28T04:43:15+5:30

जिल्ह्यातील १३ लाख, ७४ हजार ७३५ लोकसंख्येपैकी १० लाख १३ हजार १८० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निर्धारित ...

Risod taluka leads in vaccination campaign | लसीकरण मोहिमेत रिसोड तालुका आघाडीवर

लसीकरण मोहिमेत रिसोड तालुका आघाडीवर

Next

जिल्ह्यातील १३ लाख, ७४ हजार ७३५ लोकसंख्येपैकी १० लाख १३ हजार १८० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाभरात १५६ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर वेळोवेळी आवश्यक प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात असून, १८ ते ४५, ४६ ते ५९ आणि ६० वर्षे वयांवरील सर्वच व्यक्तींना मोफत लस दिली जात आहे. यात २४ जुलैपर्यंत १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील १ लाख १६ हजार ३०० लोकांनी, ४६ ते ५९ वयोगटांतील १ लाख ५६ हजार ६९८, तर ६० वर्षे व त्यावरील वयोगटांच्या १ लाख ४० हजार ७५५ नागरिकांन कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. अर्थात, २४ जुलैपर्यंत ९ लाख २१ हजार ४८४ नागरिकांनी लसच घेतली नव्हती. त्यातही तालुक्याचा विचार करता रिसोड तालुक्याने ५४.५० टक्क्यांसह लसीकरणात आघाडी घेतली. त्या खालोखाल वाशिम ५१.२३ टक्के, कारंजा ४९.९८ टक्के, मंगरुळपीर ४६.८६ टक्के, मानोरा ३०.५७ टक्के आणि मालेगाव २९.३४ टक्के, असा क्रमांक येतो.

--------------

स्वयंसेवी संघटनांचे कार्य प्रशंसनीय

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी खासगी आणि स्वयंसेवी संघटनांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यास मदत झाली. त्यात रिसोड तालुक्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचे ध्येय समता फाउंडेशन या संघटनेने निश्चित केले होते. या संघटनेने स्वत: पुढाकार घेऊन रिसोड तालुक्यात जवळपास ३० हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सहकार्य केले.

--------------

मालेगाव तालुक्याचे प्रमाण सर्वात कमी

जिल्ह्यात निर्धारित लसीकरण उद्दिष्टापैकी ४५ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यात रिसोड तालुका आघाडीवर असताना, मालेगाव तालुक्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. मालेगाव तालुक्यात १,७२,६०५ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असताना, ५०,६५४ नागरिकांनीच लस घेतली आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या २९.३४ टक्के आहे. अर्थात, कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात या तालुक्यातील नागरिक उदासीन असल्याचे दिसते.

-----------

तिसरी लाट ओसरल्याचा परिणाम

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट जवळपास पूर्णपणे ओसरली आहे. जिल्हाभरात आता केवळ ५३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यातही रविवारी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, दोनच तालुक्यांत केवळ ४ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यात मालेगाव तालुक्यात १ आणि रिसोड तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश होता. कोरोना संसर्गाच्या घटलेल्या प्रमाणामुळे नागरिकांना लसीकरणाकडे पाठ केल्याचे दिसत आहे.

-------

कोट: जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील गावागावात लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रावर पुरेशा लसीही उपलब्ध आहेत. तथापि, काही तालुक्यात लसीकरणासाठी अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.

-डॉ.मधुकर राठोड.

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

----------------

जिल्ह्याची लोकसंख्या - १३,७४,७३५

जिल्ह्याचे उद्दिष्ट- १०,१३,१८०

झालेले लसीकरण-४.५३,२५१

----------

वाशिम तालुका

लसीकरण उद्दिष्ट - २,११,१०३

झालेले लसीकरण- १,०८,१६७

---------------

कारंजा तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,७६,८७४

झालेले लसीकरण- ८८,४०८

----------

मं.पीर तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,४४,९४०

झालेले लसीकरण- ६७,९२४

-----------

रिसोड तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,७१,६९१

झालेले लसीकरण- ९३,५६३

----------

मालेगाव तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,७२,६०५

झालेले लसीकरण- ५०,६५४

----------

मानोरा तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,३५,८६८

झालेले लसीकरण- ४१,५३५

Web Title: Risod taluka leads in vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.