रिसोडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:37 PM2018-09-17T13:37:22+5:302018-09-17T13:37:59+5:30
रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही.
पाच वर्षांपासून प्रश्न प्रलंबित: लाखो रुपये खर्चून बांधली ईमारत
लोेकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही.
स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे महत्त्वपूर्ण व्यवहार पाहणाºया रिसोड दुय्यम निबंधक कार्यालयाची जुनी ईमारत शिकस्त झाली आहे. अवघ्या ३६ गुंठे क्षेत्रावर उभारलेल्या जुन्या ईमारतीत १९०५ पासून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. अर्थात गत ११३ वर्षांपासून तालुक्यातील जनतेला याच ईमारतीतून सेवा मिळत आहेत. या कालावधीत रिसोड तालुक्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आणि व्यवहारांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाची जुनी ईमारत अपुरी पडू लागली. त्यामुळे या कार्यालयाच्या नव्या ईमारतीसाठी सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि लगोलग ईमारतीचे बांधकामही पूर्ण झाले; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकार्पण झाले नसल्याने जुन्या आणि अपुºया ईमारतीतच स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडण्यात येत आहेत.