राजूरा परिसरातील नदी,नाले कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:47 PM2019-07-12T12:47:27+5:302019-07-12T12:47:55+5:30
दमदार पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने राजूरा परिसरातील नदीनाले, तलाव कोरडेच असल्याची विदारक अवस्था आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा (वाशिम) : पावसाळा सुरु होवून जवळपास दिड महिन्याचा कालावधी लोटला; मात्र दमदार पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने राजूरा परिसरातील नदीनाले, तलाव कोरडेच असल्याची विदारक अवस्था आहे.
चालु हंगामात परिसरातील शेतकऱ्यांनी अल्पशा पाण्याचे भरवशावर कशीबशी पेरणी उरकली. अनेक शेतात नांगरणीचे ढेकळेसुद्धा पावसाने विरघळले नाहीत. पेरणीनंतर पडलेल्या थोडयाफार पावसाच्या भरवशावर पिकांची कोवळी रोपे शेतात उभी आहे. आणखी चार,सहा दिवस पावसाने दडी मारल्यास पिके कोमेजून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गाव परिसरातील विहीर, कुपनलिकांना अद्याप पाण्याचा थेंबही आलेला नाही. त्यामुळे राजूरासह परिसरातील काही गावातील नागरिकांना टँकरच्या पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. चालु हंगामात गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या पेºयात वाढ होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात होती. अनेकांनी कपाशीच्या बियाण्यांच्या बॅगा सुद्धा खरेदी केल्या होत्या. मात्र जुनच्या पंधरवाडयात परिसरात पावसाचा थेंबही पडला नाही तर शेवटच्या आठवडयात थोडयाफार पावसाच्या भरवशावर काही शेतकºयांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. कपाशी पिकांची आस लावून बसलेल्या अनेक शेतकºयांनी कपाशीचे बियाणे बदलुन सोयाबीन पेरणीला पसंती दिली. परिणामी कपाशीच्या पेºयात घट झाल्याचे दिसून येते. येत्या आठवडाभरात परिसरात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास शेतकºयासह शेतमजुरांना विविध संकटाचा सामना करावा लागणार आहे. मान्सून लांबल्याने आणि अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकºयांसह शेतमजूरांची चिंता वाढली आहे.