प्रतिकुल परिस्थितीवर केली रियाने मात
By admin | Published: June 6, 2014 12:21 AM2014-06-06T00:21:19+5:302014-06-06T00:33:34+5:30
इयत्ता बारावीत घवघवीत यश: रियाने मिळवले कलाशाखेत ९0 टक्के गुण.
शिखरचंद बागरेचा / वाशिम
प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन इयत्ता बारावीमध्ये ९0 टक्के गुण मिळविणार्या रिया जाधव हिचे परिङ्म्रम पुर्वक प्रयत्न केल्यास झोपडीतही ज्ञान सुर्य उगवू शक तो. हे सिध्द करुन दाखवून दिले.
शाळेतील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील इयत्ता १२ वी कला विभागाची विद्यार्थीनी रिया संजय जाधव हिने सोमवारी लागलेल्या निकाला मध्ये ९0.६४ टक्के गुण मिळवून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
रियाने १ ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शाळेचे शिक्षण धृव विद्या मंदिर येथे घेतले. पाचवी मध्ये राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत प्रवेश केल्यानंतर तीने इयत्ता दहावीमध्ये ७३ टक्के, गुण मिळविले. तर इयत्ता १२ वी मध्ये ९0 टक्केच्या वर गुण मिळवून सर्वांनाच तीने आश्चर्याचा धक्का दिला. १९९७ ला जन्मलेल्या रियाच्या नशिबि वयाच्या एक वर्षा नंतरच हालअपेष्ठा व यातनांची सुरुवात झाली. वडिल संजय जाधव यांनी रियाची आई सविता जाधव यांना घटस्फोट न देता सोडून दिले. पतीने सोडून दिल्यानंतर परित्यक्ता म्हणून वाशिमच्या गवळीपुरा परिसरात आपल्या झोपडीवजा घरामध्ये तीची आई सविता जाधवने काबाडकष्ट क रून मुलीच्या शिक्षणास कमी पडू दिले नाही. त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी शहरातील एका शोरुम वर तुटपुंज्या पगारावर खासगी नोगरी करण्याची वेळ करून रियाला वडीलांची कमतर ता भासू न देता हिमतीने सांभाळत शिकवून उत्तम यश मिळविण्याची प्रेरणा दिली.
वैचारिक विषय कविता व लेख हिलहण्याचा छंद असलेल्या रियाने शालेय जिवनात वक्तृत्व व निबंध स्पर्धांमध्ये अनेकदा पुरस्कार मिळविले आहेत. शिघ्र कवी म्हणून उदयास येत असलेल्या रियाने अनेक कविता लिहल्या आहेत.
आयुष्यात कुठल्याही प्रकारची परिस्थिती अनुकुल नसतांना हसतखेळत प्रतिकुल परिस्थितींवर मात करुन व शाळेतून घरी आल्यावर घरच्या कामामध्ये आईला मदत करुन मिळालेल्या वेळेत रिया हिने नियमित पणे अभ्यास केला व हे यशोशिखर गाठले.
रिया हिने आपल्या यशाचे श्रेय आई सविता जाधव व शिक्षकवृंदाना दिले आहे. उच्च विद्याविभुषीत होवून मागासलेल्या समाज बांधवांची पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा करण्याचे स्वप्न आपण बाळगून आहोत असे रिया ने शेवटी लोकमत जवळ व्यक्त केले.