आरओ प्लांट बंद; गावकऱ्यांना प्यावे लागत आहे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 11:24 AM2021-08-04T11:24:34+5:302021-08-04T11:24:53+5:30

Villagers have to drink contaminated water : ९ ग्रामपंचायतचे आर ओ प्लांट सध्या बंद आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

RO plant closed; Villagers have to drink contaminated water |  आरओ प्लांट बंद; गावकऱ्यांना प्यावे लागत आहे दूषित पाणी

 आरओ प्लांट बंद; गावकऱ्यांना प्यावे लागत आहे दूषित पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानाेरा :   मानोरा पंचायत समिती अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातुन १० ग्रामपंचायतला आर ओ  प्लांट मंजूर झाले होते. काही दिवस हे प्लांट सुरू होते, त्यापैकी आता ९ ग्रामपंचायतचे आर ओ प्लांट सध्या बंद आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावळी, पाळोदी, भूली,हातना, इझोंरी, कुपटा, शेंदोना वाईगौळ विठोली येथे १४ वित्त आयोग व स्थानिक विकास निधीमधून ३ ते ५ लक्ष रुपये खर्च करून हे प्लांट उभारले आहेत. 
गावकरी यांना शुध्द पाणी मिळावे,त्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता ही योजना राबवन्यात आली होती. मात्र काही कारणामुळे सध्या हे आर ओ प्लांट बंद आहेत. पैकी इझोंरी येथील प्लांट सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन प्लांट पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी गावकरी यांचेकडून होत आहे. 
 यापैकी सावळी,वाई, गौळ, भूली, हातना,  शेंदोना,  विठोली येथे जीवन प्राधिकरण योजनेचा पाणी पुरवठा सुरु आहे. येथे फिल्टरचे नळ योजनेचे पाणी येते. या गावात आर ओ प्लांट मंजूर करण्यात यायला नको होते. मात्र १४ व्या वित्त अयोगातून नाहकच निधी खर्च झाला, त्यातही प्लांट बंद आहे. हे विशेष.
 

Web Title: RO plant closed; Villagers have to drink contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.