धरण क्षेत्रातील रहदारीचे मार्ग बंद!
By admin | Published: October 10, 2016 03:47 AM2016-10-10T03:47:02+5:302016-10-10T03:47:02+5:30
सात ठिकाणी रस्ते व पुलांची कामे ठप्प; शेतमाल राहतोय शेतातच पडून.
सुनील काकडे
वाशिम,दि.0९- जिल्हय़ातील सात सिंचन प्रकल्प क्षेत्रातील बुडित क्षेत्रामुळे बाधित होणारे रस्ते व पुलांची कामे गत अनेक वर्षांपासून रखडली आहेत. परिणामी, प्रकल्प परिसरातील रहदारीचे मार्ग बहुतांशी बंद झाले असून, पूर परिस्थितीमुळे शेतकर्यांना खरिपातील शेतमाल घरी आणण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
गोंडेगाव लघू पाटबंधारे योजनेच्या कार्यक्षेत्रात उमरी-शेंदोणा रस्ता कामासाठी जलसंपदा विभागाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सन २0१२ मध्ये ६६ लाख रुपये रकमेचा भरणा केला. यासह काम पूर्ण करण्यासंदर्भात २0१२ ते २0१५ दरम्यान सात वेळा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र अद्याप या कामास प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे ६६ लाख रुपयांचा निधी परत करण्याबाबत १७ फेब्रुवारी २0१५ रोजी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला; पण निधीदेखील अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गायवळ लघू पाटबंधारे संग्राहक योजना कार्यक्षेत्रात वाशिम-कारंजा राज्य मार्ग क्रमांक २0१७ किन्ही ५१/६00 या पुलाच्या अंदाजपत्रकाबाबत पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सलग पाठपुरावा केला. दरम्यान, ३0 डिसेंबर २0११ रोजी १३५.६0 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले; मात्र अंदाजपत्रकात नदीच्या विसर्गानुसार अपेक्षित गाळ्यांपेक्षा अधिक गाळे ठेवण्यात आल्यासंदर्भात आक्षेप घेण्यात आला होता. २८ ऑक्टोबर २0१५ ला अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुलाच्या कामास मान्यता दर्शविण्यात आली; परंतु ३.१२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देऊन गाळ्यांची संख्या कमी करणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले. गायवळ प्रकल्पाला जून २0१५ मध्ये १२.0९ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात पुलासाठी १.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली; मात्र ३.१२ कोटी रुपयांची किंमत घेतल्यास पुन्हा शासनाकडून ह्यसुप्रमाह्ण घ्यावी लागणार असल्याने हा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही.
स्वासीन लघू पाटबंधारे योजना कार्यकक्षेतील कवठळ ते कुपटा या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाटबंधारे विभागाने २३ जानेवारी २0१५ रोजी १६२.४३ लक्ष रुपयांचा भरणा केला; मात्र कामास अद्याप प्रारंभ झालेला नाही. उकळी बॅरेज कार्यकक्षेतील राजगाव ते अनसिंग रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १.३७ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला. या कामास डिसेंबर २0१५ ला कार्यारंभ आदेश देऊन जून २0१६ पर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही बांधकाम विभागाने दिली; मात्र हे काम अद्याप प्रलंबित आहे. चाकातीर्थ लघू पाटबंधारे संग्राहक योजनेमुळे नागपूर ते औरंगाबाद राज्य मार्गावरील सबर्मसिबल पूल बाधित होत आहे. बांधकाम विभागाने पुलाची उंची वाढविल्यास चाकातीर्थ धरणात पूर्ण साठा करणे शक्य होईल. पर्यायाने मालेगावला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल, असे जलसंपदाने शासनाला कळविले आहे. वारा लघू पाटबंधारे योजनेच्या बुडित क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८९ वरील जांभरुण ते बोरी बु. या रस्त्यावरील पुलाची उंची वाढविणे आवश्यक आहे. यासाठी जलसंपदाने १.१७ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला; मात्र अद्याप या कामाला प्रारंभ झालेला नाही.
रस्ते, पुलाअभावी शेतमाल अडकला शेतात!
पाटबंधारे विभाग क्रमांक तीनच्या अधिपत्याखाली झालेल्या वारा जहागीर बृहत लघू पाटबंधारे सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्राखाली देपूळ ते बोरी रस्त्यावरील पूल पाच फूट पाण्याखाली गेला आहे. यामुळे बोरी ते देपूळ गावचा संपर्क तुटला असून, या रस्त्यावर शेती असणार्या २५0 शेतकर्यांच्या १ हजार ५00 एकर शेतातील सोयाबीन पीक शेतात ठेवण्याची वेळ आली आहे.