मुंगळा परिसरातील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:30 AM2021-05-28T04:30:12+5:302021-05-28T04:30:12+5:30
बाधितांच्या संपर्कातील माहिती वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आणखी पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ मे रोजी पॉझिटिव्ह ...
बाधितांच्या संपर्कातील माहिती
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आणखी पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित करायला सुरुवात केली.
लोणी येथे आरोग्य पथकाद्वारे तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील लोणी येथील आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य चमूने लोणी गाव गाठत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची माहिती घेतली.
लाभार्थ्यांना धान्याचे वेळेत वाटप करा!
वाशिम : सध्याचा काळ कोरोना संसर्गाचा आहे. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात येणारे धान्याचे वाटप हे वेळेत झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या जिल्हा दक्षता समितीच्या सभेत दिले.
खासगी व्यक्तींकडून विद्युतची कामे
रिसाेड : तालुक्यातील वाकद ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत वाकद, बालखेड, महागाव, गोहगाव या चार गावांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु मागील कित्येक दिवसांपासून या गावांना लाइनमन नसल्यामुळे गावातील कोणतेही वीजविषयक काम खासगी व्यक्तीकडून केले जात आहे.
लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी
रिसाेड : शहरात काेराेना लसीकरण करण्यात येत असून, या केंद्रावर गर्दी हाेत असल्याने काेराेनाच्या संसर्गाचा धाेका वाढला आहे.
नादुरूस्त विद्युत रोहित्र बदलण्याची मागणी
केनवड : केनवड परिसरातील तीन ते चार विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. नादुरुस्त राेहित्रामुळे वारंवार विदयुत पुरवठा खंडित हाेत आहे. या रोहित्रासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आले आहे. अद्याप रोहित्र मिळाले नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.