मुंगळा परिसरातील रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:32+5:302021-07-21T04:27:32+5:30

०००० निर्जंतुकीकरणाच्या प्रतीक्षेत एटीएम वाशिम : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांबाहेर व एटीएममधून पैसे काढताना कुठे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले ...

Road condition in Mungala area | मुंगळा परिसरातील रस्त्याची दुरवस्था

मुंगळा परिसरातील रस्त्याची दुरवस्था

Next

००००

निर्जंतुकीकरणाच्या प्रतीक्षेत एटीएम

वाशिम : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांबाहेर व एटीएममधून पैसे काढताना कुठे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातात तर कुठे नाहीत. मात्र, शहरातील एटीएम अजूनही निर्जंतुकीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. एटीएममध्ये येणारे ग्राहक एटीएमच्या बटणांना स्पर्श करतात. प्रत्येकाने अशा पद्धतीने मशीनला स्पर्श केला तर कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे.

००००

रिसोड परिसरात वीजपुरवठा खंडित

वाशिम : रिसोड तालुक्यातील काही गावांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी सोमवारी केली आहे.

०००००

मालेगावातील खड्डे बुजविण्याला खो

वाशिम : मालेगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. काही रस्ते खड्डेमय झाल्याने चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

००००

रेतीची अवाच्या सव्वा दराने विक्री

वाशिम : जिल्ह्यात रेतीघाट लिलाव न झाल्याने जिल्ह्यात रेती उपलब्ध नाही. घर बांधकाम करणाऱ्यांना अवाच्या सव्वा दराने रेती विकत घ्यावी लागत आहे. प्रति ब्रास सात ते नऊ हजार रुपये रेतीचे दर आकारले जात आहेत.

Web Title: Road condition in Mungala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.