कारंजात पोलिसांसह आर.सी.एफ जवानांचे पथसंचालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:41 PM2018-07-21T14:41:59+5:302018-07-21T14:42:45+5:30

वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात कारंजात पोलिसांसह आर सी एफ जवानांनी पथसंचालन केले.

Road control of the RCF jawans including police | कारंजात पोलिसांसह आर.सी.एफ जवानांचे पथसंचालन

कारंजात पोलिसांसह आर.सी.एफ जवानांचे पथसंचालन

Next
ठळक मुद्देमिश्र वस्तीतून पथसंचालन करण्यात आले. एकुण १६५ जणांनी सहभाग घेतला.


लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड :  आगामी सण उत्सवाच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी या उद्देशाने वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात कारंजात पोलिसांसह आर सी एफ जवानांनी पथसंचालन केले.
 यामध्ये ६५ आर.सी.एफ चे जवान, पोलीस उपविभागीय अधिकारी, २ पोलीस निरिक्षक, ८० पोलिस अधिकारी, पोलिस अशा एकुण १६५ जणांनी सहभाग घेतला. कारंजा शहरात आगामी गणपती व दुर्गा विसर्जन तसेच इतर सणांच्या निमित्ताने मिरवणूक विसर्जन मार्गात मिश्र वस्तीतून पथसंचालन करण्यात आले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने, कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम एम बोडखे, कारंजा ग्रामीणचे ठाणेदार गजानन गुल्हाणे, यांच्यासहीत पोलिस कर्मचाºयांची उपस्थिती होती.

Web Title: Road control of the RCF jawans including police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.