बोराळा जहाँगिर येथील रस्ता पुरात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:30 PM2018-09-01T13:30:58+5:302018-09-01T13:32:52+5:30
बोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.
बोराळा धरणावरून जाणारा उजवा कालवा हा सहा किमीपर्यंत जातो. त्या कालव्याच्या दोन्ही पुलाखालून जाणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. ज्या रस्त्याने वाहने नेली जात होती. आता त्या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. चरायला नेण्यात येणारी कित्येक गुरे यामुळे घसरून पडली आहे. वहिवाटीचा रस्ताच वाहून गेल्याने आता खरीप हंगामातील काढलेला शेतमाल घरी कसा आणणार, पिकांची काढणी करण्यासाठी मळणीयंत्र, इतर वाहने कशी न्यावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. हा रस्ता वाहून जाण्यास दोन महिने उलटले तरी, पाटबंधारे विभाग किंवा इतर विभागाकडून त्याची दखल घेऊन रस्त्याचे काम अद्यापही करण्यात आले नाही. उडिद, मुग ही पिके काढणीवर आली आहेत, तर येत्या काही दिवसांतच सोयाबीनही काढणीवर येणार असून, शेतकºयांनी पिकांच्या काढणीची तयारीही केली आहे; परंतु वाहने नेण्यासाठी रस्ताच नसल्याने पिक शेतातच पडून राहण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतात पडलेल्या या शेतमालाचे करावे तरी काय, असाही प्रश्न शेतकरी उपस्थिती करीत आहेत. संबंधित अधिकाºयांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरीत या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामपंचायत बोराळा जहॉगिर, शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
शेतशिवाराला जोडणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले असून, शेतीची वहिवाटच बंद झाल्याने शेतकरी खूपच हतबल झाला आहे. शेतकºयांना शेतमाल आणण्यासाठी दुसरा मार्ग नाही. याचा विचार करून या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी. शेतमालाच्या काढणीला विलंब झाल्यास हा शेतमाल पाण्यामुळे ओला होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत.
-गजानन जटाळे,
सरपंच बोराळा जहॉगिर