रस्त्याची विभागीय गुणवत्ता पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:13+5:302021-06-09T04:51:13+5:30
भर जहागीर येथील बसथांब्यावर मागील काही दिवसामध्ये बसथांब्यावर सिमेंट काॅंक्रिट रस्ता करण्यात आला. परंतु रस्त्यावर रहदारीला प्रारंभ होताच अवघ्या ...
भर जहागीर येथील बसथांब्यावर मागील काही दिवसामध्ये बसथांब्यावर सिमेंट काॅंक्रिट रस्ता करण्यात आला. परंतु रस्त्यावर रहदारीला प्रारंभ होताच अवघ्या पंधराच दिवसात रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले. सदर कंपनीच्या कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता. ज्या ठिकाणी तडे गेले आहेत तेथे रस्त्याचा जाॅईन होता असे उत्तर मिळाले . लोकमतच्या वृत्ताने विभागीय गुणवत्ता तपासणी पथकाद्वारे सदर रस्त्याची तपासणी झाल्याने यापुढे तरी रस्ता विकास कामामध्ये प्रगती होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. विभागीय गुणवत्ता तपासणी पथक संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी रिसोड ते लोणी रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता कपील वाघमारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही . तसेच ६ जून राेजी रात्रीच्या धुवाधार पावसाने मोरगव्हाण येथील नव्याने बांधल्या जात असलेल्या पुलाजवळच्या वळण रस्त्यावर रात्री दोन तास ट्राफिक जॅम झाले होते. या रस्त्याचे कामाकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.