नारेगाव ते कारंजा रस्ता झाला खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:56 AM2021-02-20T05:56:08+5:302021-02-20T05:56:08+5:30
नारेगाव ते कारंजा रस्त्याच्या मार्गावरून समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या मुरुमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू ...
नारेगाव ते कारंजा रस्त्याच्या मार्गावरून समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या मुरुमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. कारंजा लाड ते धनज बु. मार्गावरील गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यामुळे मोटारसायकलधारक नागरिकांना पाठीच्या मणक्याचे आजार होत आहे तसेच कित्येक वाहन खड्ड्यामुळे नादुरुस्त होत आहेत. या मार्गावरील नागरिकांना कारंजा येथे जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वेळेचा व इंधनाचा अपव्यय होत आहे. तरी लवकरात लवकर नारेगाव ते कारंजा लाड रस्त्याचे काम नव्याने करून नागरिकांना चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या मार्गावरील गावातून होत आहे.