रस्ता सुरक्षेची युद्धस्तरावर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:41 AM2021-01-23T04:41:22+5:302021-01-23T04:41:22+5:30
रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वेळोवेळी चौकसभा घेणे, जनजागृतीपर बॅनर लावणे, वाहनचालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा घेणे, एस.टी.मधून कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन आयोजित करणे, ...
रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वेळोवेळी चौकसभा घेणे, जनजागृतीपर बॅनर लावणे, वाहनचालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा घेणे, एस.टी.मधून कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन आयोजित करणे, प्रवासी मार्गदर्शक फलक लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना, खड्डे दुरुस्ती, साईन बोर्ड व माहिती फलक असे अनेक उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी शासनाने त्या-त्या विभागांकडे सोपविलेली आहे. परंतु, पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग वगळता नगरपालिका, आरोग्य विभाग, एस.टी. परिवहन, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळ आदी यंत्रणांकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे अभियान अपयशी ठरत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ जानेवारीच्या अंकात ‘सुरक्षा सप्ताह नावापुरता; रस्ते असुरक्षितच’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत बहुतांश यंत्रणांनी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.