सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:17 AM2021-02-18T05:17:42+5:302021-02-18T05:17:42+5:30
सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. भारती देशमुख ...
सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. भारती देशमुख यांनी केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मानवाचा जीव अमूल्य असून, त्यासाठी सर्वांनी रस्ता वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तर प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोडक यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात विविध बाबींवर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांना हेल्मेट वापर, वेगावर नियंत्रण, परवाना काढणे याविषयी मार्गदर्शन करून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख यांनी रासेयोच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसेनजित चिखलीकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आकाश जाधव याने तर आभार प्रदर्शन श्रावणी राजनकर हिने केले. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत रासेयोच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करून रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती केली. त्याच बरोबर दुचाकीधारकांना हेल्मेट वापरण्याविषयीचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयोच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.