रस्त्याचे काम बंद; गावकरी धडकले तहसिल कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:54 PM2019-07-31T17:54:02+5:302019-07-31T17:54:36+5:30

मानोरा : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथील रस्ता वनविभागाच्या संबंधित अधिकाºयांनी अडविला असून, याविरोधात गावकºयांनी बुधवार, ३१ जुलै रोजी मानोरा तहसिल कार्यालय गाठून रस्ता काम सुरू करण्याची मागणी केली.

Road work closed; The villagers were pushed into the tehsil office | रस्त्याचे काम बंद; गावकरी धडकले तहसिल कार्यालयात

रस्त्याचे काम बंद; गावकरी धडकले तहसिल कार्यालयात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथील रस्ता वनविभागाच्या संबंधित अधिकाºयांनी अडविला असून, याविरोधात गावकºयांनी बुधवार, ३१ जुलै रोजी मानोरा तहसिल कार्यालय गाठून रस्ता काम सुरू करण्याची मागणी केली.
मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्टचे नागरीक रस्त्यासाठी त्रस्त आहे. सावरगावला ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागत आहे. सावरगावला रस्ता व्हावा यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली. सन २०१४ -१५ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहीष्कारही घातला होता. शिवाय ३१ जानेवारी २०१८ रोजी कारंजा-मानोरा या मार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले होते. सावरगाव येथील नागरिकांच्या निवेदनानुसार, भारत सरकार, पर्यावरण वनविभाग आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय नागपुर यांचे २६ मार्च १८ रोजीच्या पत्रानुसार वन जमिनीला मंजुरी मिळाली. तसेच सदर प्रकरणात मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपुर यांचे पत्र ९ एपिल २०१८ नुसार मंजुरी सुध्दा मिळाली आहे. त्यानुसार मार्च २०१९ मध्ये रस्ता कामासाठी निविदादेखील काढण्यात आली. संबंधित यंत्रणेकडून कामही सुरू झाले. परंतू, त्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी रस्ता काम करण्यास मनाई केल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. दुसरा कोणताच रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांसह गावकºयांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. रस्ता काम सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी गावकºयांनी मानोरा तहसिल कार्यालयात धडक देत तहसिलदारांना निवेदन दिले. निवेदनावर ओंकार धनसिंग राठोड, अरविंद हिरासिंग नाईक, शंकर धनु जाधव, ओंकार पांडूरंग राऊत, सुखदेव किसन राठोड, भाऊराव वासुदेव राठोड , गणेश शेषराव पवार, यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Road work closed; The villagers were pushed into the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.