'रोबोट’ व ‘बायोस्कोप’च्या दुनियेत रमले बालके!

By admin | Published: November 14, 2016 04:28 PM2016-11-14T16:28:51+5:302016-11-14T16:28:51+5:30

बालदिनानिमित्त अंगणवाडी केंद्र शहा येथे ‘रोबोट’ व ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

'Robots' and 'Bioscope' ramle babies! | 'रोबोट’ व ‘बायोस्कोप’च्या दुनियेत रमले बालके!

'रोबोट’ व ‘बायोस्कोप’च्या दुनियेत रमले बालके!

Next
>‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा जागर
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १४ -  बालदिनानिमित्त अंगणवाडी केंद्र शहा येथे ‘रोबोट’ व ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या आगळया - वेगळया कार्यक्रमामध्ये बालके चांगलीच रमली होती.
जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी योगेश जवादे, बेटी बचाओ बेटी पढाओचे समन्वयक रुपेश निमे यांच्या मार्गदर्शनात या बालीका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक गोपाल खाडे यांनी शासनाच्या योजनांची माहिती उपस्थितांना देवून अंगणवाडीतील बालकांना बायोस्कोपव्दारे बेटी किती महत्वाची याबाबत जनजागृती केली. तसेच रोबोटशी संवादही साधण्यात आला.
बायोस्कोपव्दारे ‘बेटी भार नही है आधार..जीवन है उसका अधिकार शिक्षा है उसका हथियार, बढाओ कदम करो स्विकार’, पुत्र जन्माच्या करती साजरा सोहळा, कन्याप्राप्तीने का पोटी उठतो गोळा असवा सवाल मुलगा-मुलगी दोघे समान, दोघांनाही शिकवू छान हा संदेश दिला. तसेच आता 'सर्वांनी होऊया दक्ष व मुलींचे शिक्षण हेच लक्ष' सांगत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी बिल्किसबानो, गजानन सुडके, तायडे, मुख्याध्यापक शहा, अंगणवाडीसेविका सुनिता सोनोने, उज्वला पाटील, अनिता काळे, पुष्षा करडे यांनी योग्य नियोजन केले.

Web Title: 'Robots' and 'Bioscope' ramle babies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.