चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला जीवदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:28 PM2017-11-10T23:28:38+5:302017-11-10T23:29:24+5:30

वाशिम: चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला दोन तासांच्या परीश्रमानंतर बाहेर काढण्याची कामगिरी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव इंगळे व त्यांच्या सहका-यांनी शुक्रवारी केली.

Rohilla Bijan, who had fallen four days earlier in the well | चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला जीवदान 

चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला जीवदान 

googlenewsNext
ठळक मुद्देपेडगाव येथील घटनामंगरुळपीरमधील वन्यजीव पे्रमींचा पुढाकार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला दोन तासांच्या परीश्रमानंतर बाहेर काढण्याची कामगिरी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव इंगळे व त्यांच्या सहका-यांनी शुक्रवारी केली. मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव शिवारातील शेतात पाण्याच्या शोधात आलेल्या रोहिच्या कळापातील एक रोही चार दिवसांपूर्वी विहिरीत पडला होता. 
मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव शिवारात उमेश भगत यांनी विहिरीचे खोदकाम केले आहे. या विहिरीचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यांच्या शेतात तूर पिक चांगले बहरले असून, पाच ते सहा फुट उंच वाढलेल्या पिकात वन्यप्राण्यांचा संचार असतो. अशात मंगळवारी सांयकाळच्या सुमारास रोहिचा एक कळप भगत यांच्या शेतात आला. त्यावेळी तुरीच्या पिकामुळे विहिर प्राण्यांना दिसली नाही. त्यामुळे एक रोही विहिरीत पडला. सदर प्रकार भगत यांच्या लक्षात आला आणि त्यांनी रोहिला बाहेर काढण्याचे प्रयत्नही केले; परंतु साधने मर्यादित असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर त्यांनी गुरुवारी सांयकाळी याबाबत वनविभाग मंगरुळपीर आणि मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कंन्झर्वेशन टीमला माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच मंगरुळपीर वनविभागाचे राऊंड आॅफिसर अब्दुल हकिम, कारंला वनविभागाचे व्ही. बी. इंगळे आणि जी. एस. थेर यांच्यासह मंगरुळपीरचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यासह वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरचे सुबोध साठे, शुभम ठाकूर आणि संदीप ठाकरे यांच्यासह इतर सहकाºयांनी सकाळी १२ वाजता पेडगाव येथे जाऊन उमेश भगत यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या रोहिला दोन तासांच्या प्रयत्नानंतर रोहिला सुखरूप बाहेर काढले. पुन्हा एकदा वनविभागाच्या अपुºया सुविधांमुळे वन्यजीव प्रेमींना रोहिचा जीव वाचविण्यासाठी गावकºयांचा आधार घ्यावा लागला. ट्रॅक्टरचा आधार घेऊन दोराच्या साहाय्याने रोहिला बाहेर काढावे लागले. 

Web Title: Rohilla Bijan, who had fallen four days earlier in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल