ग्रामपंचायत जवळील रोहित्र नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:43+5:302021-05-29T04:29:43+5:30
ग्रामपंचायत जवळील रोहित्रात बिघाड आहे. त्यामुळे सदर रोहित्र दुरुस्त करून विद्युत पुरवठा नियमित करावा अशी मागणी महादेव जाधव यांनी ...
ग्रामपंचायत जवळील रोहित्रात बिघाड आहे. त्यामुळे सदर रोहित्र
दुरुस्त करून विद्युत पुरवठा नियमित करावा अशी मागणी महादेव जाधव यांनी महावितरणकडे केली आहे .
ग्रामपंचायत भवन काजळेश्वर येथील रोहित्रात तांत्रिक बिघाड असल्याने या विद्युत रोहित्रावरून तांडा वस्ती व आदिवासी वस्तीत अनियमित विद्युत पुरवठा केला जात आहे. महावितरण कारंजा यांनी तेथे नवीन रोहित्र दिले ,परंतु तेही व्यवस्थित चालत नसल्याने गत दहा दिवसांपासून या रोहित्रावरून वितरित होणारा विद्युत पुरवठा नियमित नाही. खंडित विद्युत पुरवठ्यामुळे समाज बांधव त्रस्त आहेत .तेव्हा कारंजा विद्युत महावितरणने या कामी लक्ष घालून नवीन रोहित्र बसवावे अशी मागणी प्रहार जनशक्तीचे सेवक महादेव जाधव , प्रदीप उपाध्ये , सुविधा वंचित ,उमेश बढे, अनिल महाराज , हसन भाई इत्यादींनी महावितरण कंपनी कारंजा यांना केली आहे .