रोहयो मंत्र्यांनी केले जानोरी गावकऱ्यांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:32+5:302021-04-23T04:43:32+5:30
असलेल्या ग्राम जानोरी येथे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री ना संदीपान भुमरे यांनी २१ एप्रिल रोजी भेट ...
असलेल्या ग्राम जानोरी येथे महाराष्ट्र
राज्याचे रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री ना संदीपान भुमरे
यांनी २१ एप्रिल रोजी भेट देऊन ग्रामपंचायत जानोरीकडून करण्यात आलेल्या रोजगार हमी तसेच पाणलोट क्षेत्र विकासकामाची पाहणी केली. यावेळी ना. भुमरे यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.
ग्रामपंचायत जानोरीच्या महिला सरपंच भारती नितीन भिंगारे, उपसरपंच, सर्व सदस्य तथा जलदूत अविनाश भिंगारे, समस्त अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांच्या समन्वयातून गावठाणच्या ३२ एकर क्षेत्रांवर दहा हजार वृक्षलागवड रोजगार हमी योजनेनुसार करण्यात
आली तसेच पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत विविध कामे केली. ना. भुमरे यांनी ग्रामपंचायत तथा
गावकरी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी काजळेश्वर सर्कलचे जि. प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे, जि. प. सदस्य डोईफोडे, पं. स. सदस्य रंगराव धुर्वे, पो. पा. विनोद भिंगारे, जलदूत अविनाश भिंगारे, प्रा. डॉ. नितीन भिंगारे, माजी सरपंच रमेश पा. भिंगारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गावकरी तसेच ग्रा.पं.च्या वतीने प्रा. डॉ. नितीन भिंगारे यांनी मंत्री तथा प्रमुख अतिथी व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ग्रामसचिव गजानन उपाध्ये, कृषी सहायक शिवा बोदळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांची हजेरी होती.