‘रोहयो’ची कामे बंदच; मजुरांवर उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:36+5:302021-07-04T04:27:36+5:30
--------- दगड उमऱ्यात अनियमित वीजपुरवठा वाशिम : तालुक्यातील दगड उमरा येथील ग्रामस्थ वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे वैतागले आहेत. ...
---------
दगड उमऱ्यात अनियमित वीजपुरवठा
वाशिम : तालुक्यातील दगड उमरा येथील ग्रामस्थ वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे वैतागले आहेत. त्यातच या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवारी खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना उकाड्यात रात्र काढावी लागली, तर वीज उपकरणांतही बिघाड झाला आहे.
----------------
वन्यप्राण्यांकडून पपई पिकाचे नुकसान
वाशिम : यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली. अतिउष्णता आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे हे पीक संकटात सापडले होते. आता हे पीक बहरत असताना वन्य प्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
-------------
शिरपूर येथील रस्त्याची दुरवस्था
वाशिम : शिरपूर जैन येथील पोलीस स्टेशन ते मालेगाव रिसोड रस्त्याला जोडणाऱ्याया बायपास मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून, आता या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे डबके साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
--------------
वाकलेले वीजखांब केले सरळ
आसेगाव : परिसरातील गावांत १५ दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही वीजखांब उन्मळून पडले, तर काही वाकले होते. त्यामुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. हे वीजखांब महावितरणने सरळ केले आहेत.
------------------
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून, त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात पीककर्जासह इतर आर्थिक व्यवहारासाठी शेतकरी बँकेत धाव घेत आहेत.
-------
जलस्रोत कोरडे
वाशिम : या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जलस्रोतांमध्ये घट झाल्यानंतर आता पावसाळा सुरू झाला तरी पोहरादेवी परिसरातील जलस्रोतांची पातळी वाढली नाही. गत आठवड्यात आलेल्या पावसामुळेही जलस्रोतांच्या पातळीत विशेष भर पडली नाही.