‘रोहयो’ची कामे बंद; मजुरांवर उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:58+5:302021-07-16T04:27:58+5:30

वन्यप्राण्यांमुळे पीक संकटात वाशिम : बांबर्डा परिसरात शेतामध्ये डाैलात उभ्या असलेल्या पिकांमध्ये वन्यप्राणी धुडगूस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. ...

‘Rohyo’ works off; Hunger on laborers | ‘रोहयो’ची कामे बंद; मजुरांवर उपासमार

‘रोहयो’ची कामे बंद; मजुरांवर उपासमार

Next

वन्यप्राण्यांमुळे पीक संकटात

वाशिम : बांबर्डा परिसरात शेतामध्ये डाैलात उभ्या असलेल्या पिकांमध्ये वन्यप्राणी धुडगूस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. वन विभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

वाशिम-पुसद महामार्गावर खड्डे

वाशिम : वाशिम ते पुसद महामार्गावरील जांभरूण जहाँगीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.

कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त

वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून, त्यामुळे विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.

लोणी बु. येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

वाशिम : श्रीक्षेत्र लोणी बु. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८३ वर येत असून, या मार्गावर लोणी बु. येथे प्रवासी निवारा उभारण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: ‘Rohyo’ works off; Hunger on laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.