‘रोहयो’ची कामे बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:55+5:302021-07-12T04:25:55+5:30
--------- अनियमित वीजपुरवठा वाशिम : तालुक्यातील काही गावांतील ग्रामस्थ वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे वैतागले आहेत. त्यातच या आठवड्यात ...
---------
अनियमित वीजपुरवठा
वाशिम : तालुक्यातील काही गावांतील ग्रामस्थ वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे वैतागले आहेत. त्यातच या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना उकाड्यात रात्र काढावी लागली. वीज उपकरणांतही बिघाड झाला आहे.
----------------
वन्यप्राण्यांकडून भाजीपाला पिकाचे नुकसान
वाशिम : यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. अतिउष्णता आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे हे पीक संकटात सापडले होते. आता हे पीक बहरत असताना वन्यप्राण्यांनी पुन्हा हैदोस घातल्याने हे पीक संकटात सापडल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
-------------
शिरपूर येथील रस्त्याची दुरवस्था
वाशिम : शिरपूर जैन येथील पोलीस ठाणे ते मालेगाव रिसोड रस्त्याला जोडणाऱ्या बायपास मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली असून, आता या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे डबके साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
--------------
वाकलेले वीजखांब केले सरळ
वाशिम : ग्रामीण भागांत १५ दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही वीजखांब उन्मळून पडले, तर काही वाकले होते. त्यामुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. हे वीजखांब महावितरणने सरळ केले आहेत.
------------------
------------------
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून, त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात पीककर्जासह इतर आर्थिक व्यवहारासाठी शेतकरी बँकेत धाव घेत आहेत.
-------