रोहयोची कामे मिळेना; कामगारांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:43+5:302021-07-07T04:51:43+5:30

------------- पोहरादेवी परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन पोहरादेवी : मानोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशक फवारणीसंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत ...

Rohyo's works were not found; In the workers' panchayat | रोहयोची कामे मिळेना; कामगारांची पंचाईत

रोहयोची कामे मिळेना; कामगारांची पंचाईत

Next

-------------

पोहरादेवी परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पोहरादेवी : मानोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशक फवारणीसंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअंतर्गत पोहरादेवी परिसरातील काही गावांत कृषी सहायकांनी शिवारात शेतकऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

------------

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : येथून जवळच असलेल्या अमरावती-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर दोनद बु. फाट्यानजीक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. या अंतर्गत मंगळवारी याठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिसांनी कसून तपासणी केल्याचे मंगळवारी दिसून आले.

------------------

वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय

वाशिम : गत काही दिवसांपासून कामरगाव परिसरातील गावांत विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. मंगळवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.

-----------

नाल्यांच्या सफाईबाबत उदासीनता

वाशिम : मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथे नाल्यांची साफसफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने मंगळवार, दि. २२ जून रोजी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

--------

पीक संरक्षणासाठी बांधबंदिस्तीची कामे

वाशिम : कामरगाव परिसरात उगवलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारून पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांनी बांधबंदिस्तीच्या कामाला वेग दिल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. उगवलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत असल्याने वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी शेतकरी बांधावर कुंपण घालत आहेत.

-------------

रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती

वाशिम : उंबर्डाबाजार-जांब या रस्त्याची दयनीय कायमच आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत असल्याचे मंगळवारी दिसले. यामुळे करताना नियंत्रण सुटल्यास अपघात घडण्याची भीती आहे.

----------

Web Title: Rohyo's works were not found; In the workers' panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.