रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी तब्बल १९ .११ कोटी रूपयांचा निधी मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:03 PM2018-08-04T13:03:03+5:302018-08-04T13:03:29+5:30
आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा: मतदार संघात काही गावातील डांबरी रस्त्यांची देखभाल दुरूस्ती रखडल्यामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली होती. ग्रामीण भागातील या मार्गावरून एस.टी.बसेस, अवैध वाहतुक, बैलगाड्या तसेच दुचाकी सारखी वाहने धावत असल्यामुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली होती. मतदार संघातील अशा रस्त्यांसाठी भरीव निधी युध्द पातळीवर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली. तसेच यापुर्वी रस्त्याच्या कामासाठी १५ कोटी रुपए मंजुर करण्यात आले होते हे विशेष.
यामध्ये कारंजा तालुक्यातील ग्राम धोत्रा, डोंगरगाव, पिंपळगाव, पिंप्री मोडक, हिवरा लाहे येथील डांबरी रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी ११२ लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. वापटी, लोणी अरब, वाढोणा, मेहा तसेच धनज येथील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १५८ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. याशिवाय लोणी अरब, निंभा जहाँ., दोनद, वडगाव रंगे या गावातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १४० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. कारंजा ते धनज रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३१३ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. कारंजा ते मोखड, कामरगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३८५ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. याशिवाय बोरगाव, म्हसला, बेलखेड, कामठा साठी ७० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला.
तसेच मानोरा तालुक्यातील गिंभा, कवठळ, बोरव्हा, रोहणा, कोलार, गिरोली, विळेगाव, शेंदुरजना, रूई या रस्त्याच्या कामासाठी १४० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. मानोरा तालुक्यातीलच हातना, हातोली, आमदरी, रूई, मेंद्रा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३५ लक्ष , मानोरा ते तळप, कार्ली रस्ता सुधारणा करण्यासाठी १८५ लक्ष रुपए मंजुर करण्यात आले. मानोरा ते गव्हा, रतनवाडी, रस्ता सुधारणा करण्यासाठी २८० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. तसेच कारंजा तालुक्यातील अनई, इंझा, येवता, मनभा ते प्रस्तावित प्रजिमा ३७ पर्यंत कि.मी. करिता १४३ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला.