मंगरुळपीर तालुक्यातील गावांसाठी २ कोटी रुपये मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:04 PM2018-11-21T14:04:21+5:302018-11-21T14:04:50+5:30
मंगरुळपीर : तालुक्यातील ३७ गावांमध्ये सिमेंटचे रस्ते आणि सभामंडप उभारण्याकरिता १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रकमेपैकी ७० टक्के वितरित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : तालुक्यातील ३७ गावांमध्ये सिमेंटचे रस्ते आणि सभामंडप उभारण्याकरिता १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रकमेपैकी ७० टक्के वितरित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे.
२०१८- १९ या आर्थिक वर्षांसाठी वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकास कामांसाठी १४ कोटी मंजूर करण्यात आले . यापैकी सुमारे दोन कोटी रुपये हे मंगरुळपिर तालुक्याला मिळाले असल्याची माहिती चंद्रकांत ठाकरे यांनी यावेळी दिली. मार्च २०१९ पूर्वी हा निधी खर्च न झाल्यास शासनाला परत पाठविल्या जाईल, तरी या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या निवडणुकांची आचार संहिता लागू नसेल याची काळजी घ्यावी लागेल. पुढील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता पाहता सदरची विकास कामे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले . यानिधी अंतर्गत मंगरुळपिर तालुक्यातील शेलगाव, चेहेल, मोहरी, भडकुंभा, निंबी, चिंचाला, हिरंगी , लाठी, चांदई, बेलखेड, शेगी, कलंबा बोडखे, दाभडी, झाडगाव, चेहेल, डोंगरखेड, गीभा, स्वाशिन, कवठलं, कोठारी, बीटोडा, चिंचखेडा, इचोरी, सायखेडा, मानोली, येडशी, वनोजा, गोगरी, तº्हाळा, नादखेडा, शिवणी रोड, लही यागावांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्त्यांकरिता प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले . वसंतवाडी ,शेलगाव,गणेशपूर, दाभडी, फाळेगाव, हिसई या गावांमध्ये सभामंडप उभारण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.