रिसोडमध्ये झेंडूच्या फुलांना ५ रुपये किलोचा दर; संतप्त शेतक-याने फुले फेकून दिली रस्त्यावर.
By admin | Published: October 2, 2016 07:12 PM2016-10-02T19:12:33+5:302016-10-02T19:12:33+5:30
वरात्रोत्सव, दसरा अन् दिवाळीच्या पृष्ठभूमिवर झेंडूच्या फुलांना ग्राहकांकडून विशेष मागणी असते. यंदा मात्र उत्पादन अधिक झाल्याने या फुलांचे दर प्रचंड प्रमाणात गडगडले. परिणामी, झेंडू उत्पादकांना
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 2- नवरात्रोत्सव, दसरा अन् दिवाळीच्या पृष्ठभूमिवर झेंडूच्या फुलांना ग्राहकांकडून विशेष मागणी असते. यंदा मात्र उत्पादन अधिक झाल्याने या फुलांचे दर प्रचंड प्रमाणात गडगडले. परिणामी, झेंडू उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. या विवंचनेत सापडलेल्या रिसोड येथील दिलीप महादुजी भांदुर्गे या कास्तकाराने २ आॅक्टोबर रोजी झेंडूची शेकडो किलो फुले चक्क रस्त्यावर फेकून देत आपला संताप व्यक्त केला.
शेती हा व्यवसाय सर्वच बाबतीत अत्यंत धोकादायक ठरू पाहत आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिप हंगामातील सर्वच पिके बाधीत झाली आहेत. प्रारंभी पावसाचा उघाड आणि गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने सोयाबिन या प्रमुख पिकाला मोठा फटका बसला. पारंपरिक पिकांची अशी अवस्था सुरू असल्याने शेतकºयांनी झेंडूच्या फुलांची शेती करण्याचा प्रयोग करून पाहिला. मात्र, तो देखील यंदा पुरता फसला आहे. सणासुदीच्या ऐन हंगामात झेंडूच्या फुलांना ३० ते ४० रुपये इतका कमी दर मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च देखील वसूल होणे कठीण झाले आहे. यासह मागणीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांची बाजारपेठेत अधिक प्रमाणात आवक झाल्याने ग्राहक मिळेनासे झाले आहेत. १ आॅक्टोबर रोजी नवरात्रातील पहिल्या दिवशी फुलांची विक्री होईल, या अपेक्षेने अनेक शेतकºयांनी रिसोडच्या बाजारात फुलांची दुकाने थाटली. मात्र, त्यास अपेक्षित ग्राहकच मिळाले नाहीत. यामुळे बहुतांश शेतकºयांना विक्रीसाठी नेलेला माल, जशाच्या तसा परत आणावा लागला. दरम्यान, सुकलेल्या फुलांचे करायचे काय, या विवंचनेत रिसोड येथील शेतकरी दिलीप भांदुर्गे यांनी सर्व फुले रस्त्याच्या कडेला फेकून देत आपला संताप व्यक्त केल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळाले.