वाशिम नगरपरिषदेची ५.८० कोटी रुपयांची कर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:22 PM2018-03-22T17:22:58+5:302018-03-22T17:22:58+5:30
वाशिम : वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी व नोटीसा दिल्याने वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी दिली.
वाशिम : वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी व नोटीसा दिल्याने वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी दिली. २२ मार्चपर्यंत ५ कोटी ८० लाख ९४ हजार २३१ रुपयांची कराचा भरणा थकीतधरकांनी केला.नगरपरिषदेच्यावतिने थकीत कराचा भरणा न केल्यास थकीतधारकांच्या घरासमोर बॅन्ड वाजविण्यासंदर्भात , वृत्तपत्रामधून थकीतधारकांची यादी, नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. याची धास्ती थकीतधारकांनी घेतल्याने कराच्या भरणा करण्यात मोठया प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्हयातील नगरपरिषद करवसुलीमध्ये वाशिम अव्वल आहे. विशेष म्हणजे २१ मार्च रोजी या एकाच दिवशी २२ लाख रुपयांचा कराचा भरणा थकीतधारकांनी केला. गत तीन दिवसांमध्ये ३० लाख रुपये तर २२ मार्चपर्यंत ५ कोटी ८० लाख ९४ हजार २३१ रुपयांची कराचा भरणा थकीतधरकांनी केला. वाशिम नगरपरिषदेची करवसुली १०० टक्के करण्यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार, एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, एम.डी. इंगळे, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद परिश्रम घेत आहे.