वाशिम जिल्ह्याला ५७.५३ कोटी रूपये निधी

By admin | Published: January 11, 2015 12:30 AM2015-01-11T00:30:03+5:302015-01-11T00:30:03+5:30

दुष्काळाची पीक नुकसान भरपाई; वाशिम सर्वाधिक ११ तर मानोरा तालुक्याला सर्वात कमी ८ कोटींचा निधी.

Rs.57.53 crores fund to Washim district | वाशिम जिल्ह्याला ५७.५३ कोटी रूपये निधी

वाशिम जिल्ह्याला ५७.५३ कोटी रूपये निधी

Next

वाशिम : २0१४च्या खरीप हंगामामध्ये अपुर्‍या पावसामुळे जिल्हय़ातील सर्व प्रकारच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. अवर्षणामुळे बाधितांना मदत देण्यासाठी वाशिम जिल्हय़ाकरिता ५७ कोटी ५३ लक्ष रुपये इतका निधी प्राप्त झाला असून, याचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेल्या निधीमुळे वाशिम तालुक्यात सर्वाधिक ११ कोटी रूपये तर सर्वात कमी ८ कोटीचा निधी मानोरा तालुक्याला मिळाला आहे, तसेच मालेगाव तालुक्याला ९ कोटी ५0 लाख, रिसोड तालुक्याला १0 कोटी ५0 लाख, मंगरूळपीर तालुक्याला ८ कोटी ५३ लाख तर कारंजा तालुक्याला १0 कोटी रूपये निधी मिळाला आहे. निधी मागणीच्या ४0 टक्के असून, तो खर्च झाल्यानंतर उर्वरित निधी वितरित केल्या जाणार आहे. याबाबतच्या यादया लावण्यात आल्या आहेत. या यादयांबाबत आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख २0 जानेवारी आहे. सर्व यादया तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. त्यापाहून काही त्रुट्या असल्यास १३ तारखेपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हय़ातील सहाही तालुक्यातील शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार असून, कारंजा तालुक्यातील अल्प, अत्यल्प भूधारक बाधित शेतकर्‍यांची संख्या २९,८५८ आहे. यामध्ये कारंजा परिसरातील ३0९१, कामरगाव ३५९0, धनज बु. ३६६0, खेर्डा ३५६३, पोहा , उंबर्डा व येवता ४१00 तर हिवरा लाहे ३४५९ आहे.
२0१४ च्या खरीप हंगामात दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाकडून शेतकर्‍यांना देण्यात आलेली आर्थिक मदतीच्या रकमेचा निधी जिल्हय़ातील प्रत्येक तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. याचे वाटप लवकरात लवकर करण्यात येत असून, त्या अनुषंगाने यादया तयार करून आवश्यक ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई तोकडी असल्याचे काही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

Web Title: Rs.57.53 crores fund to Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.