आरटी-पीसीआर तपासणीचे दर शासनाकडून निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:37+5:302021-04-18T04:40:37+5:30
स्वॅब घेण्याच्या ठिकाणापासून वाहतूक खर्चासह ज्या ठिकाणापर्यंत सुधारित दर ५०० रुपये, कोविड केअर सेंटर, रुग्णालय, अलगीकरण कक्ष ६०० रुपये, ...
स्वॅब घेण्याच्या ठिकाणापासून वाहतूक खर्चासह ज्या ठिकाणापर्यंत सुधारित दर ५०० रुपये, कोविड केअर सेंटर, रुग्णालय, अलगीकरण कक्ष ६०० रुपये, रुग्णाच्या राहण्याच्या ठिकाणापासून वाहतूक खर्चासह ज्या ठिकाणापर्यंत पाठविण्यापर्यंत सुधारित दर ८०० रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. रॅपिड ॲण्टिजेन रुग्ण स्वत:हून प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास २५० रुपये, तपासणी केंद्रापासून अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास ३००, रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास ४०० रुपये, रुग्ण स्वत:हून प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास ३५० रुपये, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास ४५० रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास ५५० रुपये दर असणार आहेत. या दरानुसार चाचणी करून द्यावी लागणार आहे. जिल्ह्यात शक्यतोवर सर्वच रुग्ण शासकीय कोविड केअर सेंटर, शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत कोरोना चाचणी करीत आहेत. ज्यांना खासगी प्रयोगशाळेत चाचणी करावयाची आहे, त्यांच्यासाठी शासनाने दर निश्चित केले आहेत.