आरटीई : मोफत प्रवेश घेण्याला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:02 PM2019-07-19T17:02:38+5:302019-07-19T17:02:45+5:30
वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाली असून, या बालकांना आता २४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाली असून, या बालकांना आता २४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. यापूर्वी ही मुदत १८ जुलैपर्यंत होती.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ५४३ आणि दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी तिसरी लॉटरी सोडत काढली असून, यामध्ये २७० बालकांची निवड झाली. निवडपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, यापूर्वी १८ जुलैपर्यंत अंतिम मुदत होती. विहित मुदतीत अनेक पात्र बालकांना मोफत प्रवेश घेता आला नाही. जिल्ह्यात २७० बालकांची निवड झालेली असतानाही, १२५ बालकांचा प्रवेश झाला आहे. मोफत प्रवेशापासून पात्र बालक वंचित राहू नये म्हणून या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली होती. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने आता २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, या मुदतीत तिसºया लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या बालकांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. २७० पैकी १२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून अजून १४५ बालकांचे प्रवेश उर्वरीत आहेत. या बालकांच्या पालकांनी २४ जुलैपर्यंत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर यांनी केले आहे.