आरटीई: अंतिम मुदतीनंतरही मोफत प्रवेशाच्या जागा रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 03:16 PM2019-07-24T15:16:20+5:302019-07-24T15:16:25+5:30
मुदत संपल्यानंतरही मोफत प्रवेशाच्या जवळपास २५० जागा रिक्त राहिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत तिसºया लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी २४ जुलै अशी अंतिम मुदत होती. ही मुदत संपल्यानंतरही मोफत प्रवेशाच्या जवळपास २५० जागा रिक्त राहिल्या आहेत. एकूण ९६५ पैकी ६९० बालकांचे प्रवेश झाले आहेत.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्ग, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ९३ नोंदणीकृत खासगी शाळांमध्ये राबविली जात आहे. या शाळांतील एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ५४३ बालकांची आणि दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. विहित मुदतीत पालकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर न केल्याने प्रवेशपात्र ९३१ पैकी ३७८ बालकांचे प्रवेश झाले नव्हते तर उर्वरीत ५५३ बालकांनी प्रवेश घेतले. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी काढलेल्या तिसºया लॉटरी सोडतीत २७० बालकांची निवड झाली. ११ जुलै ते १६ जुलैपर्यंत या बालकांनी संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत अनेक बालकांना प्रवेश घेता न आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत १३७ बालकांनी प्रवेश घेतले तर उर्वरीत १३३ बालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधला नाही. त्यामुळे ही बालके मोफत प्रवेशापासून वंचित राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिन्ही लॉटरी पद्धतीतून जवळपास ६९० बालकांनी प्रवेश घेतले आहेत. एकूण ९६५ जागा असल्याने ६९० जागेवर प्रवेश झाले असून, उर्वरीत २७५ जागा रिक्त राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
शिक्षणाधिकाºयांना घ्यावा लागणार आढावा
मोफत प्रवेश प्रक्रियेला २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. २४ जुलैपर्यंत पात्र बालकांनी प्रवेश घेणे बंधनकारक होते. अंतिम मुदतीपर्यंत जवळपास १३३ बालकांनी शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधला नाही. त्यामुळे या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रिक्त जागांसंदर्भात शिक्षणाधिकाºयांनी (प्राथमिक) २५ व २६ जुलै रोजी आढावा घेऊन त्याची निश्चिती करावी, अशा सूचना वरिष्ठस्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार या दोन दिवसात रिक्त जागांचा आढावा घेऊन वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाणार आहे.