आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात ९३ शाळांची नोंदणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:44 PM2019-03-01T14:44:24+5:302019-03-01T14:44:45+5:30

वाशिम : जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ४ मार्चपर्यंत शाळांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

RTÉ: Registration of 93 schools in Washim district for free admission! | आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात ९३ शाळांची नोंदणी !

आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात ९३ शाळांची नोंदणी !

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ४ मार्चपर्यंत शाळांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील एकूण ९३ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी पात्र आहेत. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील शाळांना ४ मार्चपर्यंत आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत ९३ शाळांनी नोंदणी केली असून, ४ मार्चपर्यंत हा आकडा ११० च्या वर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
दरम्यान, मोफत प्रवेशासाठी पात्र शाळांची नोंदणी करण्यासाठी सुरूवातीला ८ ते २२ फेब्रुवारी असा कालावधी देण्यात आला होता. तर पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २५ फेब्रुवारी ते ११ मार्च आणि पहिली सोडत काढण्यासाठी १४ ते १५ मार्च असे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र या प्रवेश प्रक्रियेच्या सुरूवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने वेळापत्रकात बदल झाला आहे.  आता शाळांच्या नोंदणीसाठी ४ मार्चपर्यंतची मुदत ठेवण्यात आली आहे. तर पालकांना ५ मार्चपासून आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ५ मार्च ते २३ मार्चपर्यंत राहणार आहे. तांत्रिक कारणामुळे या वेळापत्रकातही भविष्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
अशा आहेत तालुकानिहाय शाळा
वाशिम    २९
मं.पीर    १७
मालेगाव १६
कारंजा    ११
रिसोड    ११
मानोरा    ९
एकूण    ९३

Web Title: RTÉ: Registration of 93 schools in Washim district for free admission!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.