आरटीई : मोफत प्रवेशासाठी ९७ शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:49 PM2020-02-09T17:49:00+5:302020-02-09T17:49:07+5:30

जिल्हयातील ९७ खासगी शाळांची नोंदणी झाली आहे.

RTE: Registration of 97 schools for free admission | आरटीई : मोफत प्रवेशासाठी ९७ शाळांची नोंदणी

आरटीई : मोफत प्रवेशासाठी ९७ शाळांची नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरटीई अंतर्गत पात्र बालकांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हयातील ९७ खासगी शाळांची नोंदणी झाली आहे. शाळा नोंदणीसाठी १० फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून, ११ फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. 
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान शाळांना नोंदणी करावी लागणार होती. या कालावधीत पुरेशा संख्येत खासगी शाळांची नोंदणी होऊ शकली नाही. त्यानंतर ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतू, या कालावधीतही पुरेशा संख्येत शाळांची नोंदणी झाली नाही. आता नोंदणीसाठी १० फेब्रुवारी अशी अंतिम मुदत करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत वाशिम जिल्हयातील ९७ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ९९३ जागा राखीव आहेत. ११ ते २९ फेब्रुवारी या दरम्यान प्रवेशासाठी पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.  गतवर्षी जिल्ह्यात ११० च्या वर  शाळांची नोंदणी झाली होती. नोंदणीसाठी मुदतवाढ मिळल्याने शाळांच्या नोंदणीत वाढ होण्याची शक्यता शिक्षण विभागातून वर्तविली जात आहे.


आरटीई अंतर्गत आता खासगी शाळांना १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते.  वाशिम जिल्हयात ९७ शाळांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक शाळांनी नोंदवी करावी, अशा सूचना संबंधित शाळांना दिल्या आहेत.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम

Web Title: RTE: Registration of 97 schools for free admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.