‘आरटीओं’ची २२ कोटींची महसूल वसुली !

By admin | Published: April 10, 2017 04:23 PM2017-04-10T16:23:54+5:302017-04-10T16:23:54+5:30

एकूण उद्दिष्ट १९.८० कोटींचे असताना, उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ११२ टक्के महसूल वसूली केली.

RTI revenue recovered from 22 crores! | ‘आरटीओं’ची २२ कोटींची महसूल वसुली !

‘आरटीओं’ची २२ कोटींची महसूल वसुली !

Next

वाशिम : वाशिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात २२ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. एकूण उद्दिष्ट १९.८० कोटींचे असताना, उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ११२ टक्के महसूल वसूली केली.
वाहनांना परवाना देण्याबरोबरच वाहतूक नियमांची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. विविध प्रकारची महसूल वसुली करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांविरूद्धही दंडात्मक कारवाई केली जाते.  सन २०१६-१७ या वर्षात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ४८७६ वाहनांविरूद्ध कारवाई करीत एक कोटी ४९ लाख ४७ हजार रुपये दंड व ९६ लाख २३ हजार रुपयांची करवसूली करण्यात आली. याशिवाय टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक इत्यादी परवानाधारक वाहन मालकांकडून २० लाख २२ हजार ७४७ रुपयांचा व्यवसाय करही वसूल करण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.

Web Title: RTI revenue recovered from 22 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.